शाह सेनेला महापौर काय उपमहापौर पदही देण्याची भाजपची इच्छा नाही, सुषमा अंधारेंचा टोला

शाह सेनेला महापौर काय उपमहापौर पद देखील देण्याची इच्छाशक्ती भाजपचे दिसतं नाही, असा टोला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटाला लगावला.
Sushma Andhare : शाह सेनेला महापौर काय उपमहापौर पद देखील देण्याची इच्छाशक्ती भाजपचे दिसतं नाही, असा टोला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटाला लगावला. साताऱ्यामध्ये ड्रग्स कारवाई करुन समूळ उच्चाटन करावे हे आम्ही कधीपासून सांगत आहोत. पण तेव्हा कारवाई झाली नाही, कारवाई करणे योग्य आहे पण त्याचं टायमिंग मुंबईचा महापौर निवडताना होतंय हे फार विशेष असल्याचे अंधारे म्हणाल्या. शाहसेना आणि अजित पवारांना याचे साक्षात्कार देखील झालेत पण ते त्यावर बोलत नाही असं अंधारे म्हणाल्या.
उदयाला कदाचित शाह सेनेला प्रमुखांनी सांगितलं की तुमचा पक्ष बंद करा तर कदाचित ते बंद ही करतील, अशी टीका सुषमा अंधारे यांनी शिंदेसेनेवर केली. जे व्यवस्थेची भाटगिरी करतात त्यांना व्यवस्था पुरस्कृत करते. व्यवथेचे जे दोष दाखवतात त्यांना मात्र बहिष्कृत केलं जात असल्याचे अंधारे म्हणाल्या. भगतसिंह कोश्यारी सारख्या भाटगिरी करणाऱ्यांना पुरस्कार दिले जात असतील तर नियम अजून बदलले नाहीत असं समजायचं असे अंधारे म्हणाल्या.
कराड तालुक्यातील पाचुपतेवाडी येथे पुण्याच्या DRI विभागाच्या पथकाची मोठी कारवाई, 6 हजार कोटीचे ड्रग्ज जप्त
कराड तालुक्यातील पाचुपतेवाडी येथे पुण्याच्या DRI विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली असल्याचे समोर येत आहे. DRI विभागाच्या पथकाने एक शेड सील केले असून या शेडमध्ये अमली पदार्थांची निर्मिती केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. या ठिकाणी ड्रग्स अमली पदार्थ तयार केलं जात असल्याची उलटसुलट चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू आहे. या कारवाई बाबत सातारा, कराड पोलिसही अनभिज्ञ अ आहेत. त्यामुळे नक्की या ठिकाणी कोणता अमली पदार्थ तयार केला जात होता व किती जणांना ताब्यात घेण्यात आले याची माहिती समोर येऊ शकली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, किमान 6 हजार कोटीचे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. धाड टाकणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये तीन आयपीएस अधिकारी आहेत. सर्व पथक गुजराथ येथून आल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला बाबा मोरे याचा हा कारखाना असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी त्याला ताब्यात घेतले
